(रत्नागिरी)
गोळप येथील कु. आदिती अनिल पालकर हिने लक्ष्मी केशव विद्यालय कसोप-फणसोप प्रशालेत एसएससी परीक्षेत ९२% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, रत्नागिरी तालुका सल्लागार आयु. विजयजी पालकर आणि सुमित पालकर (गोळप) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कु. आदितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथ सुपूर्त करून गुणगौरव करण्यात आला. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत यशाची उंच शिखरं गाठो, अशी सदिच्छा मान्यवरांनी व्यक्त केली. कु. आदिती ही आयु. केशव ल. पालकर यांची पुतणी आणि अनिल ल. पालकर यांची कन्या आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे फणसोप गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

