(रत्नागिरी)
रत्नागिरी कराटे असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला मोफत ॲडव्हान्स कराटे ट्रेनिंग कॅम्प उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या सुरु झाला. कॅम्पदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना काता–कुमिते, स्पर्धात्मक कराटेचे नियम तसेच स्वसंरक्षण, याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले.
या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य, तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले. परिसरातील अनेक शाळा कॉलेजातील कराटे प्रेमी विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.
कॅम्पचे आयोजन 23, 30 नोव्हेंबर आणि 7 व 14 डिसेंबर 2025 या दिवशी बॅडमिंटन हॉल, क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुतीमंदिर, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
कॅम्पचे मार्गदर्शन रत्नागिरीतील नामवंत कराटे प्रशिक्षक श्री. जावेद मिरकर, श्री. सूरज बने, श्री. अरुण बेग यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना कराटे चे काता, कुमिते आणि स्वसंरक्षणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण मिळाले. तसेच सहाय्यक कराटे प्रशिक्षक नौशीन कापडी, तेजस जाधव, अयान मिरकर, रिया माचकर, दिव्य यादव, ध्रुव बसणकर, यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे,तसेच या शिबिरामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन कराटे या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे फायदे घ्यावे असे कराटे एसोसिएशन रत्नागिरी या संस्थे मार्फत आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे रत्नागिरीतील कराटे खेळाला मोठे प्रोत्साहन मिळाले असून भविष्यात असे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याची मागणी वाढत आहे.

