(कळझोंडी / किशोर पवार)
बौद्धजन पंचायत समिती मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी ९८ वा.चवदार तळे सत्याग्रह, महाड क्रांती दिन महोत्सव सकाळी १० ते २ या वेळेत क्रांती भूमी महाड येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आयुष्यमान आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
या महाड क्रांतिदिन महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य माजी सहसचिव दिनेश डिगंळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते सदानंद कृष्णाजी येलवे यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे हेही उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख वक्ते म्हणून कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष व बौद्धजन पंचायत समिती सहकारी पतपेढीचे अध्यक्ष किशोर मोरे, बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे हे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणार आहेत. तर सूत्रसंचालन महाड बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस सखाराम जाधव हे करणार आहेत.
महाड तालुका बौद्धजन पंचायत समिती अध्यक्ष अशोक जाधव त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये अशोक कांबळे,एच आर पवार, मनोहर मोरे,चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ, नागसेन गमरे, विठ्ठल जाधव, रवींद्र पवार, प्रकाश करूळकर, चिटणीस श्रीधर साळवी, लवेश तांबे, यशवंत कदम, अनंत शिर्के, भगवान तांबे, प्रमोद सावंत, अनिरुद्ध जाधव, संदेश खैरे, श्रीधर जाधव, रवींद्र शिंदे आदी मान्यवर व तमाम शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील हजारो अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या शाखांतील तमाम धम्म बंधू भगिनीने या महाड क्रांती दिन चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे उपक्रमशील व सेवाभावी दानशूर अध्यक्ष आयु. प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सह सेक्रेटरी शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केले आहे.