(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी शहरापासून जवळच असणाऱ्या बसणी पंचक्रोशी ग्रंथालयात जागतिक महिला दिन ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. सुरूवातीला प्रमुख पाहूणे सेवानिवृत्त डि.वाय्.एस्.पी. विलास भोसले यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथालयाला मोलाचे सहकार्य करणारे विलासजी भोसले यांचे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बसणी ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विलास भोसले यांनी महिला दिनाचे महत्त्व, महिलांचे हक्क यावर उपस्थित महिला भगिनी यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी श्रीम.शैला सोहनी पुरस्कृत पाककला प्रदर्शन ठेवणेत आले होते.
या स्पर्धेमध्ये दहा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परिक्षण विलासजी भोसले,.जयवंत कदम, व श्रीम.प्रिया बंदरकर यांनी केले.त्यामध्ये पुढील प्रमाणे नंबर काढणेत आले. क्रमांक १)श्रीम.अन्वी अनिकेत ठिक _शुगर फ्री नाचणी केक, २)श्रीम.वैदेही विवेक झगडे, पालक पदार्थ, ३) श्रीम. सरिता सुरेश शिंदे,बिटचा वापर जेवण थाळी.
उत्तेजनार्थ पारितोषिक १)श्रीम. सृष्टी साष्टांग मयेकर, भाजी कटलेट.२)श्रीम. संचिता संदिप कदम,गाजर हलवा,शेंगदाणा लाडू.,सदर कार्यक्रमास गावातील महिलावर्ग, ग्रंथपाल मदतनीस श्रीम. पाटील, कर्मचारी श्रीम गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष जयवंत कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.