(संगमेश्वर)
निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या सदस्यांमार्फत छत्रपती संभाजी महाराजांची नित्य पूजा करण्यात आली. या सह्याद्रीच्या खोऱ्यात कडेकपारीत माझ्या राजांच्या पाऊलखुणा आहेत. स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास इथल्या कणाकणात सामावलेला आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळणारा वारा सुद्धा या नरवीरांच्या पराक्रमाच्या शौर्य गाथा गातो. तोच वारा श्वास म्हणून आम्ही या उरात भरून घेतो. या स्वराज्याचा स्मृतीगंध आम्ही वारसा म्हणून जपतो, हा कृतार्थ भाव अंतःकरणात ठेवून या ग्रुपचे सर्व सहकारी व इतर मान्यवर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचरणी नतमस्तक झाले.
या नित्य पूजेला निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन, मंगेश बाईत, गंगाराम टोपरे, संतोष पाटणे, रुपेश कदम, विरेंद्र कदम, राकेश जिमन, विनोद खानविलकर, कसबा गावाच्या सरपंच पुजा लाणे मॅडम, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे धारकरी प्रभाकर म्हादे, रणजित चव्हाण, जिवन जाधव, सार्थक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.