(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कडवई कुंभारवाडीतील रोशन सुर्वे यांच्या अंगणात थेट अजगराने एंट्री केल्याने सारेच भयभीत झाले. तातडीने येथील तरुण मित्रांनी या अजगराला सर्पमित्रांच्या माध्यमांतून रेस्कु करण्याचे ठरवले. रोशन सुर्वे यांनी सर्पमित्र कुंडलिक देऊलकर व कमलेश पाटील यांना फोन करून पाचारण केले.
सर्पमित्र कुंडलिक यांनी आपलं कौशल्य वापरून या अजगराला सहज पकडले. घराच्या अंगणात अजगर पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला होता. मात्र सर्पमित्राने अगदी सहज अजगराला पकडले. सुमारे आठ फुट लांब असणाऱ्या या अजगराला कुंडलीक व कमलेश या दोन सर्फमित्रांनी जीवदान दिले आहे.
कुंडलिक देऊलकर व कमलेश पाटील हे अनेक वर्षे कडवई पंचक्रोशीत साप पकडण्याचे काम निस्वार्थपणे करत आहेत. भलामोठा अजगर पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. त्यांच्या या कामाबद्दल गावातून त्यांचे कौतुक होत आहे.