(मुंबई)
महाराष्ट्रात दुसर्यांदा सत्तेत आलेल्या महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका कायम सुरू आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या तर आता पुन्हा एकदा 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राजेंद्र निंबाळकर, संजय यादव, डॉ. राजेंद्र भारुड, दीपक कुमार मीना, समीर कुर्तकोटी, महेश आव्हाड आणि कीर्ती किरण पुजार या अधिकाऱ्यांचे बदल्या करण्यात आल्या आहे. नव्या वर्षातील दीड महिन्यांच्या कालावधीतच तिसऱ्यांदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील 7 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी (ता.25) काढले आहेत.
राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, राजेंद्र निंबाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई येथे कार्यरत होते. तर संजय यादव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर दीपक कुमार मीना, अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच समीर कुर्तकोटी यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश आव्हाड, व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई यांना महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांना धाराशिव येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत
1) कीर्ती किरण पुजार (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची जिल्हाधिकारी, धाराशिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2)राजेंद्र निंबाळकर (IAS:SCS:2007) व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3) संजय यादव (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, मुंबई शहर, मुंबई यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4) डॉ. राजेंद्र भारुड (IAS:RR:2013) आयुक्त, TRTI, पुणे यांना प्रकल्प संचालक, रुसा, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
5) दीपक कुमार मीना (IAS:RR:2013) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे यांची सहआयुक्त, राज्य कर, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6)समीर कुर्तकोटी (IAS:SCS:2013) यांची आयुक्त, TRTI, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7) महेश आव्हाड (IAS:SCS:2015) व्यवस्थापकीय संचालक, Haffkine Bio-pharma Corporation, Mumbai यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.