( मुंबई )
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, खासदार, आमदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे.
महानगरपालिका निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी अनुभवी आणि लोकप्रिय चेहऱ्यांकडे सोपवत शिवसेनेने निवडणुकीसाठीची रणनीती स्पष्ट केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत संघटनात्मक अनुभव, प्रशासकीय कामकाजाची जाण आणि जनसंपर्क असलेले नेते प्राधान्याने घेतल्याचे दिसून येते.
शिवेसना स्टार प्रचारकांची यादी
- एकनाथ शिंदे ,मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री
- रामदास कदम, नेते
- गजानन कीतीकर, नेते
- आनंदराव अडसूळ, नेते
- डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार
- प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
- डॉ.निलमताई गोन्हे, नेत्या
- मिनाताई कांबळी, नेत्या
- गुलाबराव पाटील, नेते व मंत्री
- दादाजी भुसे, उपनेते व मंत्री
- उदय सामंत, उपनेते व मंत्री
- शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री
- संजय राठोड, मंत्री
- संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री
- भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री
- प्रकाश आबिटकर, मंत्री
- प्रताप सरनाईक, मंत्री
- आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
- योगेश कदम, राज्यमंत्री
- दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार
- श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार
- धैर्यशील माने, खासदार
- संदीपान भुमरे, खासदार
- नरेश म्हस्के, खासदार
- रवींद्र वायकर, खासदार
- मिलिंद देवरा, खासदार
- दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री
- शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार
- राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार
- मनिषा कायंदे, सचिव व आमदार
- निलेश राणे, आमदार
- संजय निरुपम, प्रवक्ते
- राजू वाघमारे, प्रवक्ते
- ज्योती वाघमारे, प्रवक्ते
- पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष
- राहुल लोंढे, युवसेना सचिव
- अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
- समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
- शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या
- गोविंदा अहुजा, माजी खासदार
गोविंदा यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश झाल्याने प्रचाराला वेगळी रंगत येण्याची शक्यता असून, शहरी मतदारांवर त्याचा प्रभाव पडेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रचाराची यंत्रणा सक्रिय करत निवडणुकीत पूर्ण ताकद लावण्याचे संकेत दिले आहेत.

