(खेड)
दिनांक-२१/०२/२०२५ रात्री १०:४० ते ०२:३० चे दरम्यान आवशी येथे विहिरीमध्ये पडलेल्या एका व्यक्तीला व कुत्र्याला एम.आय.डी.सी. अग्निश्मन दल लोटे परशुराम यांनी 80 फुट खोल विहिरीमध्ये उतरून जीवदान दिले. अग्निश्मन दलाच्या टीम ने दोरीच्या सहायाने विहिरीत खाली उतरून २ ते 3 तसाच्या शर्थी चे प्रयत्न करून एका व्यक्ती ला व कुत्र्याला रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच नंतर ऐम्बुलेंसमधून परशुराम हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.
वर्दिवरील अधिकरी व कर्मचारी उप अग्निश्मन अधिकारी- ए.जी.सरवदे, प्रमुख अग्निश्मन विमोचक व्ही.एन.देसाई, एस.एस.कुलये, चालक यंत्र चालक-एम.एस.मोरे, अग्निश्मन विमोचक(फायरमन), एम.डी.पाचांगणे, व्ही.व्ही.कारंडे,पी.आर.कांबळे आदींनी वरील कामगिरी पार पाडली.