(खेड)
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपून तिसंगी हा गाव माझंच गाव आहे असे मानून अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या व शिक्षकी पेशामध्ये निष्कलंक चारित्र्य असणाऱ्या पद्माकर जोशी सर यांचे कार्य खरोखरच अतुलनीय आहे. ते माझे सर्वात जवळचे मित्र आहेत याचा मला अभिमान आहे, असे गौरवोदार मिर्ले नंबर एक केंद्रशाळेचे मुख्याध्यापक अजित भोसले यांनी पद्माकर जोशी सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त बोलताना काढले.
तिसंगी नवानगर शाळेचे मुख्याध्यापक व तिसंगी केंद्रातील ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक पद्माकर जोशी गुरुजी यांचा सेवापूर्ती सोहळा तिसंगी नवनगर शाळेमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तिसंगी गावचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार भोसले, तिसंगी नवानगर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेश भोसले, मिर्ले केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक अजित भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिसगाव नंबर 1 शाळेचे पदवीधर शिक्षक विजय सकपाळ होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिसंगी आपटा कोंड चे केंद्र मुख्याध्यापक रोहन देवकते यांनी केले प्रास्ताविक तिसंगी नवानगर शाळेच्या शिक्षिका अंकिता अजित भोसले यांनी केले तिसंगी आपटाकोंड केंद्रातर्फे सत्कारमूर्ती पद्माकर जोशी यांना भेटवस्तू देण्यात आली
या कार्यक्रमाला भाग्यश्री काणेकर संदीप घाणेकर शैलेश पराडकर नारायण शिरकर सुनील जंगम गंगाधर घुगरे सरला मावळी दिपाली खामकर अनुराधा शिंदे ज्योती वाघ जया दोरकर पूजा भोसले सिद्धार्थ पवार उपस्थित होते