(गणपतीपुळे / वैभव पवार)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाटद जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुख म्हणून संतोष हळदणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सहदेव वीर यांची वरवडे पंचायत समिती गणाच्या उपविभाग प्रमुख म्हणून बिनविरोध करण्यात आली आहे.
खंडाळा येथील शिवसेना शाखेला नूतन रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळे यांनी भेट दिली. यावेळी हळदणकर आणि वीर यांना नियुक्ती पत्र तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांचे हस्ते देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव व विजय देसाई, शिरगांव विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, गावखडी विभाग प्रमुख किरण तोडणकर , जेष्ठ शिवसैनिक श्री. बारगुडे व श्री भोसले निवेंडी, युवा सेना कार्यकर्ते साईनाथ जाधव, विभागीय कार्यालय प्रमुख माजी सरपंच आप्पा धनावडे, कळझोंडी शाखा प्रमुख अप्पा आग्रे व शांताराम वीर, वरवडे शाखाप्रमुख संदिप सुर्वे, युवा सेना विभाग प्रमुख अनिल फडकले, युवा सेना उपविभाग प्रमुख हेमंत किरडवकर व निरंजन महाकाळ, वाटद उपशाखाप्रमुख अतुल मेस्त्री , शेखर भडसावळे, अमोल भुवड, प्रकाश नाचरे, नांदिवडे माजी सरपंच सौ. दीक्षा हळदणकर, युवासेना कार्यकर्ते चिराग हळदणकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित आणि नूतन विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुख यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.