(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात येणाऱ्या कोळंबे-परचुरी येथील नदीपात्रात काही दिवसांपूर्वी एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून खालील दिलेल्या वर्णनाच्या पुरुष मृतदेहा संदर्भात कोणाला माहिती असल्यास संगमेश्वर पोलीस ठाण्याला माहिती कळवण्याचे आवाहन संगमेश्वर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कोळंबे -परचुरी नदी पत्रावर असलेल्या पुलाखाली पाण्यात सुमारे 40 ते 45 वर्षीय वय असलेल्या अनोळखी पुरुष व्यक्तीचा मृतदेह 17 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास आढळून आला होता. संगमेश्वर पोलिसांकडून त्या मृतदेहाचे वर्णन खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. वर्ण निमगोरा, बांधा मध्यम, डोक्यावर बारीक काळे केस, अंगात गुलाबी रंगाचे हाफ हाताचे कॉलरचे टि-शर्ट त्यांचे मागील बाजुस “PROUD TO एक SWAERO HYDERABAD” असे लिहलेले व टिशर्टवर पुढील डावे बाजुस सिम्बॉल असून त्यावर “TSWREIS ANTIGRAVITY ABOVE INFINITY” असे लिहलेले आहे. नेसणीस काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट त्यांचे आतमध्ये निळ्या रंगाची हाफ बरमुडा आहे.
वरील वर्णनाच्या पुरुषाच्या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास संगमेश्वर पोलीस ठाणे येथे खालील फोन नंबरवर त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन संगमेश्वर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
१. अमित यादव पोलीस निरीक्षक, संगमेश्वर पोलीस स्टेशन ९२७३९२६४२०
२ . राजेश शेलार पोलीस उपनिरीक्षक ८६०५४०१३१७
३. संगमेश्वर पोलीस स्टेशन ८६०५४०१३१७
४. स्थानिक गुन्हे शाखा, रत्नागिरी ०२३५२-२७१२५६५, नियंत्रण कक्ष, रत्नागिरी०२३५२-२२२२२२