(देवरूख / प्रतिनिधी)
मराठी मनाचा मानबिंदू, जाज्वल्य देशाभिमानी आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ११व्या स्मृतीदिनानिमित्त संगमेश्वरातील शिवसेना संपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार, त्यांचे संघटन कौशल्य आणि त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व याबाबत विभागप्रमुख आतिष पाटणे यांनी आपले विचार मांडत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संगमेश्वर शिवसेना शाखेतर्फे ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस करण्यात आली तसेच रुग्णांना फळाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
या प्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष विवेक शेरे, विभाग संघटक संदीप रहाटे, संजय खातु, विभागप्रमुख आतिष पाटणे, युवासेना उपतालुकाप्रमुख सुधीर चाळके, विभागप्रमुख प्रथमेश साळवी यांच्यासह राजेश पडे, निलेश खापरे, नथुराम पडे, ओंकार चव्हाण, केतन चावंडे, मधुर आंब्रे, सुनील जोशी, रमेश मोरे, काशिनाथ फेपडे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

