(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समितीचे वतीने महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजीबाबा सकपाळ यांचा स्मृतिदिन पंचशील बुद्ध विहार येथे अभिवादन सभा घेऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कळझोंडी शाखेचे अध्यक्ष अनिल पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, उपाध्यक्ष संदीप पवार, सभापती प्रकाश पवार, सल्लागार किशोर पवार व संजय पवार तसेच सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा -नलिनी पवार, सेक्रेटरी रीना पवार, खजिनदार नंदिनी पवार आदी मान्यवर, शाखा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत त्यांचे पिता रामजीबाबा यांची आदर्शवत संस्कार करण्याची जिद्द , चिकाटी आणि मेहनत घेऊन सांभाळलेली कौटुंबिक जबाबदारी या बाबत विविध दाखले देऊन उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धम्माबंधव उपस्थित होते.