(खेड)
रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनचे सदस्य आणि आवाशी ( ता.खेड ) ग्रामपंचायतच्या सदस्या श्रध्दा आंब्रे यांनी दापोली, खेड आणि मंडणगडचे आमदार योगेश कदम यांना दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन दिले. या मागण्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडू, असे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले.
सध्याची दिव्यांगांची असलेली पेन्शन ही दिव्यांगाना पुरेशी नाही, ती प्रती महिना रू.१,५००/- वरून त्यात वाढ करून रू.४,०००/- करून मिळावी आणि दिव्यांगांची पेन्शन दर महिन्याच्या १० तारखेच्या आत पेन्शन खात्यात जमा व्हावी. प्रत्येक आमदारांच्या दरवर्षीच्या आमदार निधीतून शासनाच्या जी आर प्रमाणे ५% निधी हा दिव्यांगांवरती खर्च करून दिव्यांगाना त्याचा लाभ द्यावा. दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या घरकुल निधीत रू.१,२०,०००/- वरून निधीमध्ये रू.२,५०,०००/- एवढी वाढ करण्यात यावी. या विविध दिव्यांग मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी हॅण्डीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनकडून करण्यात आली. यावेळी अरूण कदम (अण्णा कदम, शशिकांत चव्हाण, श्रद्धा आब्रे ग्रामपंचायत आवाशी सदस्य उपस्थित होते.