(गुहागर)
रविवार दि. 19 जानेवारी 2025 रोजी कोपरी विरार पूर्व येथे नागेश्वर क्रिकेट संघ दोडवली आयोजित प्रीमियम लीग स्पर्धा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडल्या. या स्पर्धेमध्ये एकूण संघ आठ संघ नावे १) शौर्य ११ क्रिकेट संघ २) माऊली ११ क्रिकेट संघ ३) शिवतेज क्रिकेट संघ ४) स्वामी समर्थ माऊली संघ ५) टायगर ११ क्रिकेट संघ ६) स्वयंभू क्रिकेट संघ ७) ए वन क्रिकेट संघ ८) ध्रुवेश इलेव्हन क्रिकेट संघ या संघाचा समावेश होता. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून दोडवळी गावचे अध्यक्ष शंकर कांबळे, दोडवळी गावातील उद्योजक मनसे पदाधिकारी सुरेंद्र निकम, ग्रामस्थ मंडळी, यशवंत कांबळे, गणपत मोडेकर, यशवंतराव कांबळे, ज्ञानेश कांबळे, शाहीर गिरीश रनगडे, सचिन कांबळे, दत्ताराम गावणंग, मंगेश अवेरे, विठ्ठल हुमणे, निलेश कुळये, राज भडवलकर, नितीन करबेळे, आदी इतर मान्यवर उपस्थित होते. रुची स्पोर्टचे मालक महेंद्र आयरे, विजय गोताड, दीपक मोरे, अवधूत कांबळे, विकास सावंत, विजय हुमणे, आदी मान्यवरांचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी अनेक रसिक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
सकाळी स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ग्रामदेवतेला श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर ग्रामदेवता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पगुच्छ अर्पण करून राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर मैदानामध्ये जाऊन ट्रॉफीचे अनावरण आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ही स्पर्धा युट्युब लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण असल्यामुळे हजारो लोकांनी घरी बसून स्पर्धेचा आनंद घेतला.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वामी समर्थ माऊली क्रिकेट संघ तर दुसरा क्रमांक माऊली ११ क्रिकेट संघ आणि तिसरा क्रमांक शिवतेज क्रिकेट संघ यांनी पटकावला. या स्पर्धेसाठी अनेक हितचिंतक आणि दानशूर व्यक्तीनी सढळ हस्ते मदत केली, त्याबद्दल क्रिकेट संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.
नागेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने श्री रवींद्र मुरमुरे, श्री अशोक कांबळे, श्री दिनेश कांबळे, यांच्या विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक जी कांबळे, रवींद्र मुरमुरे, भरत हुमणे, संदीप निकम, दिनेश कांबळे, रमेश हुमणे, सर्वेश हुमणे, विठ्ठल पंडये, आणि अनेक खेळाडूंचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचे समालोचन संदेश भडवलकर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. स्पर्धेचा समारोप हा बक्षीस वितरण करून करण्यात आला.
या स्पर्धेचे उद्दिष्ट म्हणजे गावातील तरुण मंडळी यांना एकत्र करून, त्यांच्या कलागुणांना वाव देणे असा होता. शेवटी सर्वांचे आभार मानून स्पर्धेचा समारोप करण्यात आला.