(खेड)
सवेणी नं.1 ता.खेड या शाळेचा नावलौकिक जिल्हाभर नव्हे तर संपूर्ण भारतभर नाव करणारे शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हास्तरावरून नासा व इस्रो या स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये नासा – अमेरिका अंतराळ संशोधन केंद्र) आणि इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) अभ्यास दौऱ्यासाठी यशस्वी प्रदीप चव्हाण इ.७ वी व आदिती नागेश पवार इ.७ वी तसेच इस्रोसाठी – (भारतीय अंतराळ संशोधन केंद्र) अभ्यास दौऱ्यासाठी हर्षद लव कोंडळकर इ.६ वी याची निवड झाली आहे.
ग्रामपंचायत सवेणी तर्फे सवेणी नं.1 शाळेतील मुलांचा सत्कार करण्यात आला. या तिन्ही प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेट देऊन गौरव करण्यात आला. याबरोबरच मुख्याध्यापक श्री.गोपाळ जाधव, विज्ञान विषय शिक्षक श्री.एकनाथ पाटील, श्री.गणोजी माने, सौ.स्मिता शिंदे, श्री.अजय म्हादे या मार्गदर्शक शिक्षकांचे व त्यांच्या पालकांचे ग्रामपंचायत सवेणी व ग्रामस्थांकडुन विशेष कौतुकास्पद सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच श्री उमेश देवरुखकर, सदस्य श्री राजेंद्र गुजर, माजी सरपंच श्री.मुख्तारभाई कावलेकर, सदस्य श्री सुरेश घाडगे, माजी सरपंच सौ.मिना सावरटकर, सदस्या सौ.अक्षता सागवेकर, सदस्या श्रीमती अर्पणा महाडीक, ग्रामपंचायत अधिकारी सौ.वर्षा जगताप, कु.वैशाली शेळके व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

