(रत्नागिरी /प्रतिनिधी)
खंडाळा ते मिरवणे या मार्गावरून दुचाकीने प्रवास करताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने वाटद-मिरवणे फाट्यावरील वळणावर दुचाकी घसरल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जयगड सागरी पोलिस ठाण्यात संबंधित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलाऊद्दीन इद्रीस समानी (वय २५, रा. रिंगी फाटा, मनोज निंबरे यांच्या घराशेजारी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तो एमएच-०८-एल-८७५२ क्रमांकाची दुचाकी घेऊन खंडाळा ते मिरवणे या दिशेने जात होता. वाटद-मिरवणे फाट्यावरील वळणावर आल्यानंतर रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता दुचाकी हयगयीने चालविल्याने वाहन रस्त्याच्या साइडपट्टीवरून खाली उतरले आणि घसरले, अशी फिर्याद देण्यात आली आहे.
या प्रकरणी संतोष विजय शिंदे (वय ५०, व्यवसाय नोकरी, जयगड सागरी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २८१ अन्वये जयगड सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


