(रत्नागिरी)
गुरूवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर हातखंबा, ता. जि.रत्नागिरी येथे गुरुवार दिनांक 19/12/2024 रोजी विद्यालयात गुरूवर्य अ. अ.देसाई यांच्या 25 वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी होते.
यावेळी संस्थेचे आजीवसेवक, कोल्हापुर विभाग प्रमुख श्री. श्रीराम साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, तालुका क्रीडाधिकारी श्री गणेश जगताप, मुख्याध्यापक श्री बाळासाहेब धोंगडे, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री सुनिलदत्त देसाई, श्री पठाण सर, श्री म्हाप, केंद्रप्रमुख श्री विष्णू पवार, झाडगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पाटील सर, श्री तानाजीराव गायकवाड सर, श्री.अण्णासाहेब जठार, सौ निवळकर, सौ पवार वहिनी, उपसरपंच सुनील डांगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील नूतन भांडारगृह, नूतन व्यायाम शाळा साहित्य यांचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थ्यांचे अटल टिंकरिंग लॅब मधील सर्व प्रयोग उपकरण श्री आझाद नदाफ सर, विद्यार्थी यांनी प्रमुख मान्यवरांना प्रात्यक्षिकासह दाखवण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन,कलादालनामधील चित्र प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शन याचे देखील उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना व समाजाला सद्य परिस्थितीमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींबाबत मत मांडले. मुलांना यशस्वी करिअर घडवण्यासाठी विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले.
आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये मिळवलेले यश अपयश त्याचबरोबर त्यांचे असणारे प्रयत्न यांबाबत चर्चा करत आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने खेळांमध्ये यश मिळवत उत्तम करिअर घडवता येते त्याचबरोबर शाळेसाठी आवश्यक असणारे विविध क्रीडा साहित्य कशा पद्धतीने मिळवता येते त्यासाठी असणारे प्रयत्न शाळेने करावेत असे मत व्यक्त करत शाळेला पूर्ण सहकार्य करण्याचे आव्हान देत मनोगत व्यक्त केले.
श्री पठाण सर यांनी गुरुवर्य अ.आ.देसाई यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त हॉटेल अलंकार डिलक्स हातखंबा व संपूर्ण देसाई कुटुंबीय यांच्याद्वारे दरवर्षी कशा पद्धतीने 19 डिसेंबर चा कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचबरोबर विविध उपक्रम राबवले जातात शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात. या बाबी आपल्या मनोगतामध्ये स्पष्ट केल्या. व संपूर्ण देसाई कुटुंबीयांचे आभार मानले.
गुरुवर्य अ.आ.देसाई यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, व राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा घेण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार व सन्मान सोहळा माननीय श्री पठाण सर यांच्या मार्गदर्शनानुसार प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आला.
यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. गुरूवर्य अ.आ.देसाई यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचे प्रायोजक हॉटेल अलंकार डीलक्स व संपूर्ण देसाई कुटुंबीय हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री संदीप शिरतोडे सर प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री बाळासाहेब धोंगडे केले तर आभार श्री कुमार चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.