( मुंबई )
मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि काशीबाई मोतीलाल पटेल मातोश्री कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, ठाकुर्ली (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित मुंबई विद्यापीठ आंतर-महाविद्यालयीन पुरुष व महिला जलतरण स्पर्धा ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, लेकशोर ग्रीन्स, पलावा सिटी, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडली.
या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या पुरुष व महिला संघाने एकूण २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदके पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला जलतरण संघाने उपविजेतेपद मिळवून सुवर्ण अक्षरांनी नोंद केली.
पुरुष गट
करण मिलके – १०० मीटर बटरफ्लाय – कांस्य पदक.
महिला गट
तनया मिलके –
१) १०० मीटर बॅकस्ट्रोक – रौप्य
२) २०० मीटर मेडले – रौप्य
३) ५० मीटर फ्रीस्टाइल – रौप्य
४) ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक – कांस्य
५) १०० मीटर फ्रीस्टाइल – रौप्य
६) ५० मीटर बॅकस्ट्रोक – सुवर्ण
७) २०० मीटर बॅकस्ट्रोक – कांस्य
८) ४०० मीटर फ्रीस्टाइल – कांस्य
९) २०० मीटर बटरफ्लाय – रौप्य
४×१०० मीटर फ्रीस्टाइल रीले (महिला संघ) – सुवर्ण पदक
संघ सदस्य : तनया मिलके, संस्कृती जाधव, श्रावणी सावंत, नफिजा मंगा.
या यशस्वी कामगिरीसाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष महेश मिलके, सौ. गौरी मिलके तसेच प्रा. कल्पेश बोटके (सहाय्यक क्रीडाशिक्षक) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
मुंबई आंतर विद्यापीठ जलतरण पुरुष आणि महिला स्पर्धेत पदक आणि सर्वसाधारण जलतरण 2025-26 स्पर्धे चे पाहिले उपविजेतेपद प्राप्त विद्यार्थी खेळाडू यांना र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष , डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

