(गुहागर)
गुहागर पंचायत समिती आयोजित गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024/25 स्पर्धा भातगाव येथे आई जुगाई देवी मंदिर परिसरातील क्रिडांगणात संपन्न झाल्या.
जिल्हा परिषद शाळा तवसाळ तांबडवाडी गुहागर रत्नागिरी ही उंच उडी लहान गट मुलगे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक कु. हर्ष दिपक निवाते याने पटकावला. तर कु. आरंभ विनोद वाघे याने ( क्रिकेट स्पर्धा ) बेस्ट फलंदाज खेळाडू म्हणून निवड झाली, व कु. दर्शिल अशोक निवाते लहान गट मुलगे ( खोखो ) उत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श मराठी शाळा तवसाळ नं.१ शाळेची विद्यार्थीनी कु.ईश्वरी महेश सुर्वे हिने थाळी फेक या क्रीडा प्रकारा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सर्व खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
डेरवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. एकुण ९ तालुक्यातील सर्व खेळाडू व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तर तवसाळ गाव पंचक्रोशी मधील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मुलांच्या या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक- कु.अंकुश मोहिते, कु. साईनाथ पुजारा सर, श्री संदिप भोये सर व आदर्श शाळा तवसाळ नंबर १ चे मुख्याध्यापक- श्री संदीप खांडगावकर सर, श्री रविंद्र राठोड सर यांनी मेहनत घेतली. शा. व्य. समिती पालक वर्ग तवसाळ पंचक्रोशी वतीने समस्त ग्रामस्थ महिला मंडळ आणि सोशल मीडिया प्रसार क्रीडा प्रेमी श्री सचिन कुळये सह मुंबईकर पुणे मंडळींनी पुढील डेरवण येथे होणाऱ्या जिल्ह्यस्तरीय हिवाळी क्रिडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या आहेत.