(लांजा)
नवरा दारू पिऊन घरी आल्याने दोघांमध्ये झालेल्या भांडणातून ३१ वर्षीय विवाहितेने स्वयंपाक खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी लांजा तालुक्यातील चिंचुर्टी हुंबवरणेवाडी येथे घडली.
आराध्या अजित जाधव (३१) असे विवाहितेचे नाव आहे. तिचा पती अजित बबन जाधव हा गुरुवारी दारू पिऊन घरी आला असता दोघांमध्ये वाद झाला. सायंकाळी ४:१५ ते ४:३० वाजण्याच्या दरम्यान घरामध्ये कोणीच नसल्याचे पाहून आराध्या हिने गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती पती अजित बबन जाधव (३२) यांनी लांजा पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे व सहकाऱ्यांनी पंचनामा केला. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव हे करीत आहे.