(राजापूर)
तालुक्यातील तेरवण येथील एका महिलेची एका महिलेसह अरविंद सिन्हा नामक एका अज्ञात व्यक्तीने कमी वेळेत जादा परताव्याचे आमिष दाखवून ५ लाख ८५ हजार ३०७ या रकमेची ऑनलाईन फसवणूक केली. याबाबतची फिर्याद संबंधित महिलेने राजापूर पोलिसांत दिली आहे.
दि. २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. तक्रारीनुसार फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर एका अज्ञात महिलेने बेटिंग ॲपवर गुंतवणूक केल्यास कमी वेळेत जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडून फिर्यादी यांची ४ लाख ८७ हाजार ३०० रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच अरविंद सिन्हा याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी येळात जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडून फिर्यादी यांची ९७ हजार ९९८ रुपयांची फसवणूक केलेली आहे.
दोघांनी मिळून किर्यादी यांची एकूण ५लाख ८५ हजार ३०७ इतक्या रकमेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अरविंद सिन्हा व अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.