(जैतापूर / राजन लाड)
आज सकाळपासून नाटे–जैतापूर उतारावर अडकलेल्या टँकरला दोन क्रेन आणि एका जेसीबीच्या सहाय्याने यशस्वीरित्या हटवण्यात आले. सुमारे चार तासांपासून ठप्प झालेली अवजड वाहनांची वाहतूक अखेर पूर्वपदावर आली आहे.
घटनास्थळी नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सतत हजर राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते. स्थानिक नागरिकांनीही वाहतूक नियंत्रण आणि जनजागृतीमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
या कामगिरीसाठी सागरी पोलीस ठाणे, नाटे येथील पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडेकर यांनी सर्व संबंधित यंत्रणा तसेच स्थानिक नागरिकांचे आभार मानले आहेत.