(रत्नागिरी)
मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर २०२४ रोजी कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी च्या महिला व्हॉलीबॉल संघाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद आणि रौप्य पटकावले.
या स्पर्धेत महिला व्हॉलीबॉल संघात १) स्वरा शिंदे २) मधुरा राऊत ३) गंधाली बाणे ४) मनसी बेंद्रे ५) सनिका लिंगायत ६) श्रेया सारंग ७) मीनल पवार ८) दीक्षा मोहिते ९) ऐश्वर्या लोंढे १०) बिशना थापा ११) सानिया शेख १२) हार्दिका सुर्वे या विद्यार्थ्यांनिनी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले होते.
मुंबई विद्यापीठ कोंकण झोन महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेतपद तसेच रौप्य पदक प्राप्त विद्यार्थ्यानिना र.ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती. शिल्पताई पटवर्धन. कार्यवाह श्री सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा.कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी , कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.