(जाकादेवी / संतोष पवार)
सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ जाकादेवी खालगाव आयोजित वार्षिक उत्सवात सांस्कृतिक व प्रबोधनाच्या धार्मिक कार्यक्रमांचे लक्षवेधी भरगच्च स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी स.१० वा.देवीच्या मिरवणुकीचा आगमन सोहळा उत्साहात संपन्न झाला. दु.१२ वा. देवीची प्रतिष्ठापना सायंकाळी ६ वा. स्वामी समर्थ भजन मंडळ रत्नागिरी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार दि. ४ रोजी दु.१२ वा. आरती , रात्री आरती , गरबा दांडिया नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,शनिवार दि. ५ रोजी १२ वा. आरती, सायंकाळी ६ वा.विश्वकर्मा भजन मंडळ आगनरळ यांचा कार्यक्रम,रात्री आरती गरबा दांडिया नृत्य , ९ वा. रेकॉर्ड स्पर्धा लक्षवेधी ठरणार आहेत.
रविवार दि. ६ रोजी दु. १२ वा. आरती सायंकाळी ६ वाजता गोपाळकृष्ण प्रासादिक संगीत भजन मंडळ आगनरळ भोईवाडी यांचा धार्मिक कार्यक्रम,रात्री आरती आणि गरबा नृत्य ९ वा.रेकॉर्ड स्पर्धा होणार आहेत. सोमवार ७ रोजी दुपारी आरती ,रात्री आरती आणि गरबा दांडिया नृत्य ,मंगळवार दि. ८ रोजी १२ वा. आरती व महाप्रसाद तर सायंकाळी ६ वा.ओम साई प्रासादिक मंडळ भजन मंडळ डावखोल कडेवठार यांचा कार्यक्रम , रात्री आरती, दांडिया गरबा तर ९ वा. होम मिनिस्टर पहिली फेरी, बुधवार दि.९ रोजी दु. आरती सायंकाळी ६ वा. साई प्रासादिक भजन मंडळ फुणगूस कडेवठार ता संगमेश्वर यांचा कार्यक्रम, रात्री आरती, गरबा दांडिया.
गुरुवार दि. १० रोजी दुपारी आरती ,३ वा. फनी गेम्स सायंकाळी ५.३० वा. होम मिनिस्टर दुसरी फेरी, ६ वा. उत्कर्षा मंडळ महिला मंडळ भाटीमिऱ्या यांचा कार्यक्रम, रात्री आरती ,गरबा दांडिया, शुक्रवार दि.११ रोजी दु. आरती ,दु. ४ वा. फनी गेम्स रात्री ९ वा.होम मिनिस्टर तिसरी अंतिम फेरी, रात्री १० वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा, शनिवारी १२ रोजी आरती दुपारी ३ वा. भव्य विसर्जन मिरवणूक सोहळा पार पडणार आहे.
होम मिनिस्टर नाव नोंदणी ८ ऑक्टोबरपर्यंत करावी. अधिक माहितीसाठी प्राची देसाई 9421201265, बंटी सुर्वे 9657678736 यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ जाकादेवी खालगावतर्फे करण्यात आले आहे. हा सार्वजनिक उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, तरुण-तरुणी, भाविक वर्ग मोठ्या भक्तिभावाने मेहनत घेत आहेत.