(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज (रविवारी) सायंकाळच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक व्यवसायिकांना यश आले. गणपतीपुळे येथे आज सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास पर्यटकांची गर्दी झाली होती, याच दरम्यान सायंकाळच्या सुमारास जयगड येथील जेडब्ल्यू पोर्ट मरीन कंपनीचे तीन कर्मचारी सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते.
यावेळी समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी तीन जण समुद्रात उतरले असता तिघांनीही समुद्राती चाल पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न घेता खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. सध्या पावसाळी महिने संपत आले असले तरी समुद्रात चाल पडलेले आहेत. तरीदेखील पर्यटक अति उत्साहाच्या भरात समुद्रात खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात.
आज (रविवारी) सायंकाळी फिरण्यासाठी आलेल्या आणि समुद्रात उतरलेल्या जयगडच्या जे एस डब्ल्यू च्या तीन जणांनी खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीन जण खोल पाण्यात गेल्यानंतर समुद्रावर असलेल्या पर्यटकांनी आणि स्थानिक व्यवसायिकांनी आरडाओरडा केला असता तात्काळ त्यांना वाचविण्यासाठी स्थानिक जीव रक्षक आणि समुद्र चौपाटीवरील व्यवसायिकांनी धाव घेतली. मात्र त्यामध्ये मोहमत आसिफ (वय 35 राहणार वेस्ट बंगाल, सध्या राहणार जयगड) व प्रदीप कुमार (राहणार उडीसा सध्या जयगड वय 35) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर ठुकु डाकवा (वय 30 राहणार उत्तराखंड सध्या जयगड) याला वाचविण्यात जीवरक्षक व स्थानिक व्यवसायिकाना यश यश आले. त्यातील मोब्बत असिफ आणि प्रदीप कुमार यांना पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तर ठूकू डाकवा याच्यावर उपचार करून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रावरील स्वच्छतागृह इमारतीच्या समोरच्या जागेत घडली. यावेळी तिन्ही तरुणांना वाचविण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अजिंक्य रामानी, अनिकेत राजवाडकर, महेश देवरुखकर यांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या, त्यांच्यासमवेत स्थानिक व्यावसायिक निखिल सुर्वे व अन्य व्यावसायिक गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व मदतीसाठी सहकार्य केले. परंतु त्यातील दोन जणांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर एकाला वाचविण्यात वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक व्यावसायिक व पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले.
या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीतआहेत. तसेच या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.