(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा तरवळ नंबर १ येथे विद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक ५ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र रत्नागिरी चे जिल्हा अध्यक्ष ऍड.महेंद्र मांडवकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या रक्तगट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सुमारे ९१ मुलांचे रक्तगट तपासण्यात आले. या शिबिरासाठी लायन्स क्लबचे डॉ .श्री व सौ.सूर्यवंशी यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.
सदर उपक्रम शाळेत राबवण्यासाठी व्यवस्थापन अध्यक्ष राजन कुळ्ये यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी व्यवस्थापन सदस्य तुकाराम कुळ्ये प्रियंका कुळ्ये, अर्चना कुळ्ये, जयेश जाधव, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे खालगाव प्रमुख सचिन गोताड, शिक्षक, पालक उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्व पालक व ग्रामस्थांच्या वतीने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेशजी सांबरे व श्री.मांडवकर यांचे आभार मानले.

