(देवरूख / प्रतिनिधी)
संगमेश्वर खाडीपट्टयातील बंद असलेले डिंगणी आरोग्य उपकेंद्र लवकरच सुरु करण्यासंदर्भात युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी निवेदन दिले.
डिंगणी मधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सध्या बंद अवस्थेत असून पंचक्रोशीतील रुग्णांना फुणगुस किंवा संगमेश्वर ला पायापीट करावी लागते. यामध्ये वयस्कर आणि जेष्ठ नागरिक तसेच गरोदर महिलांचा समावेश आहे. मधुमेह तपासणी किंवा रक्तदाब चाचणी करणाऱ्या रुग्णांना सुद्धा लांब पल्याची पायपीठ करावी लागते. गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता अतिवृष्टी आणि उन्हाळ्यामधून लांब येणं जाण जिकरीच आहे. त्यामुळे डिंगणी गुरववाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पुन्हा लवकरच चालू करुन जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी चाळके यांनी केली.
या भेटीनंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी गोविंद मोरे यांनी त्वरीत संबधीतांना दूरध्वनी वरून संपर्क करून लवकरात लवकर डिंगणी आरोग्य उपकेंद्र चालू करावे, असे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही चाळके यांनी दिली.