(राजापूर /तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील गुरुकृपा अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणारे डॉ. चौगुले यांच्या घरी रविवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान सिलेंडरची गॅस टाकी लिकेज झाल्याने छोटे मोठे दोन स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी घरात असलेल्या दोन मुलांसह पती पत्नीची या अचानक लागलेल्या आगीमुळे तारांबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुळ गाव कोल्हापूरचे डॉ. क्रांतिकुमार चौगुले गेल्या दीड वर्षांपासून पाचल बाजारपेठेतील गुरुकृपा अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावर राहतात. तालुक्यातील रायापाटण धामणपे गावी स्वतःचा दवाखाना असलेले डॉक्टर नेहमीप्रमाणे रात्री सव्वाआठ च्या दरम्यान पाचल येथील त्यांच्या राहत्या घरी आले. बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होताना कसला तरी मोठा आवाज झाल्याने बाथरूम मधून बाहेर येऊन पाहता, गॅस सिलेंडरची टाकी किचन कट्ट्याखाली पडून त्यातून गॅस लिकेज होतं असल्याचे निदर्शनास आले. काही क्षणातच गॅस घरभर पसरू लागल्याने दोन लहान मुलं आणि पत्नीला घेऊन इमारती खाली आले व सदर घटनेबाबत आजूबाजूला व पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले.
याबाबत डॉक्टरांनी कथन केलेली माहिती अशी की, रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी नवीन गॅस ची टाकी शेगडीला जोडण्यात आली. त्यावर सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण बनवण्यात आले होते. तोपर्यंत गॅस बाबत कसलीच अडचण आली आली नाही. रात्री सव्वाआठ च्या दरम्यान नेहमीप्रमाणे दवाखान्यातून घरी आलो असता घरी पत्नी व दोन लहान मुलं घरात बेडरूम मध्ये होते. बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो असता अचानक किचन मध्ये मोठा आवाज आल्याने मी बाथरूम मधून बाहेर आल्यावर किचन कट्ट्याखाली सिलेंडर ची टाकी खाली पडून सर्व गॅस बाहेर येतं असल्याचे निदर्शनास आले.
टाकीतील गॅस सर्व घरभर पसरत होता अश्यावेळी काय करावं सुचत नव्हते, क्षणाचाही विलंब न लावता पत्नी व मुलांना रूम मधून बाहेर इमारती खाली घेऊन आलो व घरमालक तसेच रायापाटण पोलीस स्टेशन चे हेड काँस्टेबल तळेकर यांना कळवून घडलेल्या घटनेबाबत माहिती देऊन पाचल येथील गॅस एजन्सीवाल्याना माहिती दिली.
हे सर्व चालू असताना अजून एक मोठा स्पॉट झाल्याचा आवाज ऐकू आला. फ्रीज, लाईट बोर्ड, मिक्सर, फ्रूड ज्यूसर, प्लास्टिक भांडी, एक्वागार्ड, सहित सोपा, घरघुती उपकरणं मिळून एकूण लाखभर रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सदच्या घटनेबाबत माहिती पाचल मंडळ अधिकारी संजय पवार, तलाठी सतीश शिंदे, श्रीराम गॅस एजन्सी राजापूर यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी येऊन झालेल्या घटनेचा तपास केला.
एकंदरीत या सर्व प्रकारात पाचल वीजकंपनी ची मेहरबानी झाली. घटना घडली नेमकी त्या वेळी विजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे सॉर्ट सर्किट झाले नाही. परंतू देवघरात असलेल्या दिव्यामुळे घरात सर्वत्र आग पसरली होती. यावेळी ग्रामस्थ सुधाकर वाघाटे, जितू गांगण, कोकण विदर्भ कोकण बँकेचे मॅनेजर ओमकार शेटगे यांनी घटनास्थळी जाऊन वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला अशी माहिती देण्यात आली.