(राजापूर)
मौजे आजिवली, तालुका राजापूर येथे येत्या 24 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत भव्य क्रिकेट ओव्हरआर्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमुळे परिसरात क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन खतरनाक क्रिकेट क्लब यांच्या वतीने करण्यात येत असून, आजिवली बौद्ध विकास मंडळ (मुंबई / ग्रामीण) व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा क्रीडा महोत्सव पार पडणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत या मंडळांनी आजवर शैक्षणिक, कला, क्रीडा व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले असून, यंदाचे वर्ष हे या मंडळांचे पाचवे क्रीडा महोत्सवी वर्ष असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. गावपातळीवर क्रीडासंस्कृती रुजवणे व युवकांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
या क्रिकेट स्पर्धेत पंचक्रोशीतील ‘एक गाव – एक संघ’ या तत्त्वावर प्रथम येणाऱ्या 16 संघांना प्राधान्य देण्यात येणार असून, ओपन गटामधून 8 संघांना स्पर्धेत सहभागाची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बक्षिसांचे स्वरूप :
प्रथम क्रमांक : ₹30,000/- व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक : ₹20,000/- व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक : ₹10,000/- व आकर्षक चषक
उत्कृष्ट फलंदाज : आकर्षक चषक
उत्कृष्ट गोलंदाज : आकर्षक चषक
मालिकावीर : आकर्षक चषक
स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी संघांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधून एन्ट्री फी भरून आपला संघ निश्चित करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क :
रोहित कांबळे – 9082640873
दिप कांबळे – 9137714997
शरद कांबळे – 7977483141
संकेत कांबळे – 8850547170
तसेच या तीन दिवस चालणाऱ्या चित्तथरारक क्रिकेट महासंग्रामाचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

