(रत्नागिरी / वार्ताहर)
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सेक्स्युअल मेडिसिन प्रॅक्टिशनर्स मॉडर्न मेडिसिन (IASMPMM) या प्रतिष्ठित संस्थेने आयोजित केलेल्या दिल्ली येथील सेक्स पॉझिटिव्ह समिट २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त मनोविकारतज्ञ व लैंगिक समस्यातज्ञ डॉ. अतुल ढगे यांचा सहभाग असणार आहे. या समिटचे आयोजन १३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान हॉटेल हॉलिडे इन, मयूर विहार, नवी दिल्ली येथे होणार आहे. या मध्ये भारतातील व इतर देशातील लैंगिक समस्या तज्ञांचा समावेश असतो.
या समिटमध्ये आपल्या रत्नागिरीतील डॉ. अतुल ढगे १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० वाजता ‘हायपरसेक्स्युअलिटी स्पेक्ट्रम: अति लैंगिक वर्तन समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपले मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. अतुल ढगे हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ असून, त्यांना लैंगिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल आदरपूर्वक मान्यता मिळाली आहे.