दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेगाड्यांची बुकिंग आत्तापासूनच फुल होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या काळात रेल्वेत होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्ये रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त काही विशेष गाड्या सोडणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेने दिवाळीसाठी काही विशेष ट्रेन्स जाहीर केल्या आहेत. या गाड्या दिनांक 25 ओक्टोबर ते 07 नोव्हेंबर या काळात चालवण्यात येणार आहेत.
1) 01463/01464 एलटीटी-कोचुवेली विशेष ट्रेन (एकूण 8 फेऱ्या)
01463 विशेष गाडी दिनांक 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई स्थानकावरून संध्याकाळी 16.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 20.45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 विशेष गाडी दिनांक 25 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी कोचुवेली या स्थानकावरून संध्याकाळी 16.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 21.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, त्रिसूर, कोट्टानम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जं.
डब्यांची रचना: टू टीयर एसी – 03, थ्री टीयर एसी – 06, सेकंड स्लीपर – 08, जनरल – 03, एसएलआर – 01, जनरेटर कर – 01 असे मिळून एकूण 21 LHB डबे.
2) 01175/01176 पुणे – सावंतवाडी – पुणे विशेष (एकूण 8 फेऱ्या)
01175 विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवारी पुणे या स्थानकावरून सकाळी 09.35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 22.30 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01176 विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री 23.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.15 वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: पुणे, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची रचना: टू टीयर एसी – 03, थ्री टीयर एसी – 15, एसएलआर – 01, जनरेटर कार – 01 असे मिळून एकूण 20 LHB डबे.
3) 01177/01178 पनवेल – सावंतवाडी – पनवेल विशेष (एकूण 8 फेऱ्या)
01177 विशेष गाडी दिनांक 22 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी पनवेल स्थानकावरून सकाळी 09.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.05 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01178 विशेष गाडी दिनांक 23 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी सावंतवाडी स्थानकावरून रात्री 23.25 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 08.40 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची रचना: टू टीयर एसी – 03, थ्री टीयर एसी – 15, एसएलआर – 01, जनरेटर कार – 01 असे मिळून एकूण 20 LHB डबे.
4) 01179/01180 एलटीटी – सावंतवाडी – एलटीटी विशेष (एकूण 8 फेऱ्या)
01179 विशेष गाडी दिनांक 18 ऑक्टोबर ते 08 नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी एलटीटी मुंबई स्थानकावरून सकाळी 08.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21.00 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
01180 विशेष गाडी दिनांक 18 ऑक्टोबर ते 08 नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.40 वाजता एलटीटी, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे,पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची रचना: फर्स्ट एसी – 01, टू टीयर एसी – 02, थ्री टीयर एसी – 06, सेकंड स्लीपर – 08, पँट्री कार – 01, जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण 20 LHB डबे.