(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील आरवली येथे महिंद्रा पिकअप आणि मारूती ओमनी यांचा अपघात होऊन या अपघात मारूती ओमनी चालक दिलशाद अन्सारी (रा. नावडी) हा जखमी झाला आहे. त्याला डेरवण येथील दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर पिकअप चालक याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना रविवार दी.1 सप्टेंबर रोजी सकाळी आठ च्या सुमारास घडली आहे.
महिंद्रा पिकअप चालक विशाल सटवाजी कोळे (वय वर्ष 25 मूळगाव ढाकेफळ सध्या राहणार कांदिवली चारकोप) हा आपल्या ताब्यातील महेंद्रा पिकअप MH47/BL/3316 ही गाडी घेऊन अंधेरी कार्गो येथून गोवा फोंडा येथे जात असताना आरवली घाट येथे समोरून येणारी मारुती ओमनी क्रमांक MH08/AN/1055 मारुती ओमनी चालक दिलशाद अन्सारी (वय वर्ष 48 रा. नावडी हा आरवली ते संगमेश्वर) जात असताना अपघात झाला. या अपघातात दिलशाद अन्सारी याला गंभीर दुखापत झाली असून त्याला खासगी वाहनाने डेरवण येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर पिकअप गाडी चालक विशाल कोळे याला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच माखजन पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी व त्यांचे सहकारी पोलीस यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत. अपघाताचा पंचनामा करून अपघातस्थळी दोन्ही बाजूची रखडलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून अपघात संदर्भातील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी करत आहेत.