(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरात उभी केलेली ३० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची डिओ स्कूटी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी सौरभ सचिन पिलणकर (वय २५, रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, पिलणकर यांची ऑरेंज रंगाची होंडा डिओ स्कूटी (क्रमांक एमएच ०८ एव्ही ९७४३) रेल्वेस्थानक परिसरातील गिरीरत्न हॉटेलसमोरील रस्त्यावर उभी होती. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० ते १०.३० या एक तासाच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या उद्देशाने ही दुचाकी चोरून नेली. चोरीस गेलेल्या स्कूटीची किंमत ३० हजार रुपये असून, तिचा चेसीस क्रमांक ME4JF39DGHU057819 आणि इंजिन क्रमांक JF39EU2084127 असा आहे. बरेच दिवस शोध घेऊनही दुचाकीचा ठावठिकाणा न लागल्याने पिलणकर यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिसांकडून दुचाकीचा शोध सुरू आहे.


