(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आरोग्य व बांधकाम सभापती तसेच शिवसेना जिल्हा परिषद गटाचे गटनेते विलास चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांचे नियोजन केले असून, वाढदिवस उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे.
वाढदिवसानिमित्त सकाळी ९.३० वाजता साखरपा आरोग्य केंद्रात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता साखरपा केंद्र क्रमांक २ अंतर्गत विविध स्पर्धा मुळशी शाळा क्रमांक १ येथे घेण्यात येणार आहेत.
याच दिवशी साखरपा शाळा क्रमांक १ येथे सकाळी १०.३० वाजता बीटस्तरीय इयत्ता सातवी व चौथी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याची शिक्षकवर्गाने नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दाभोळे केंद्रशाळेत उपविभाग प्रमुख काशिनाथ सकपाळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, चाफवली येथे विलास चाळके यांच्या निवासस्थानी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य वाढदिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.


