(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सकाळी झोपेतून उठल्यानंतर पेज पाजल्यानंतर अचानक जोराचा दम लागल्याने ८१ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी घडली. प्रभाकर बाबू भारती (वय ८१, रा. घर नं. ५६१, ऐश्वर्या निवास, द्वारका नगर, कारवांचीवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास प्रभाकर भारती झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना पेज पाजली. त्यानंतर त्यांना अचानक जोराचा दम लागला. त्यामुळे त्यांचा मुलगा विश्वास प्रभाकर भारती आणि भाऊ प्रशांत यांनी त्यांना खासगी वाहनातून उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी १०.२५ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अहवालानुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण Acute Coronary Insufficiency With Pneumonia असे नमूद करण्यात आले आहे. या घटनेची रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १०७/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.


