(राजापूर /रत्नागिरी)
घरामध्ये भांडी घासत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ५६ वर्षीय महिलेचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. वनिता गणपत बळकटे (वय ५६, रा. तळवडे, आंबेवाडी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास वनिता बळकटे या घरामध्ये भांडी घासत होत्या. त्याचवेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या बेशुद्ध होऊन पडल्या. ही बाब लक्षात येताच त्यांचे पती गणपत बाळाराम बळकटे यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना खासगी वाहनातून ग्रामीण रुग्णालय, रायपाटण येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय माहितीनुसार, त्यांच्या मृत्यूचे कारण कोरोनरी आर्टरी स्टेनोसिस (हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन) असे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७२/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.


