(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील बारसू, खालचीवाडी येथील शुभम रविंद्र शिर्के हा तरुण १४ नोव्हेंबर २०२६ पासून बेपत्ता झाला असून, राजापूर पोलीस ठाण्यामार्फत त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता शुभम शिर्के याचे वय २७ वर्षे असून, ते बारसू, खालचीवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी आहेत. त्यांची उंची ५ फूट ८ इंच असून, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहरा लांबट आणि केस काळे व छोटे आहेत. बेपत्ता होताना त्यांच्या अंगात मोती कलरचा फुल बाह्यांचा शर्ट होता.
शुभम शिर्के यांचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याकडून शोधपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याशी ८५९१३९६७१० किंवा पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांच्याशी ७३५००२८४८२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.


