(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना व युवासेना पाचल विभागाच्या वतीने करक–कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तळवडे उपकेंद्र येथे मोफत हृदयविकार तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिर अपूर्वा किरण सामंत फाउंडेशन आणि सिद्धिविनायक हार्ट सेंटर (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. शिबिराला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ९० पेक्षा अधिक रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
सिद्धिविनायक हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ डॉ. चंद्रकांत पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. या शिबिरात ब्लड शुगर तपासणी, सर्वसाधारण शारीरिक तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आवश्यक औषधे तसेच हृदयविकार, मधुमेह, छातीत धडधड व दुखणे, धाप लागणे, हातापायांना मुंग्या येणे, गोळे येणे आदी तक्रारींवर तपासणी व उपचार करण्यात आले.
अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या वतीने सुनील गुरव, सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर, युवराज मोरे, सोनू पाथरे आदींनी या शिबिराचे आयोजन केले. शिबिराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी उपस्थित डॉक्टरांचा तळवडे गावच्या सरपंच सौ. गायत्री साळवी आणि शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. शिबिराचे उत्तम नियोजन करक–कारवली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तळवडे उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी केले. शिवसेनेच्या युवा महिला नेत्या अॅड. अपूर्वाताई सामंत यांनीही शिबिराला भेट देत आयोजकांना व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या शुभारंभ कार्यक्रमाला तळवडे सरपंच गायत्री साळवी, उपसरपंच यशवंत साळवी, करक सरपंच सुरेश ऐनारकर, जवळेथर सरपंच अंजली मोरे, पांगरी सरपंच अमर जाधव, माजी जि. प. सदस्य आबा आडिवरे, माजी जि. प. सदस्या सौ. दुर्वा तावडे, शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, युवा कार्यकर्ते संदीप बारसकर, युवासेना पाचल विभाग प्रमुख युवराज मोरे, युवा उद्योजक वैभव शेठ वायकूळ, सोनू पाथरे, सचिन पांचाळ, उदय राणे, संदीप मोरे, दीपक सावंत, हर्षद तेलंग तसेच महिला कार्यकर्त्या सिध्दाली मोरे, सौ. अपेक्षा मासये, श्वेता पवार, विद्या कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

