(गुहागर /रत्नागिरी)
तालुक्यातील अंजनवेल-सडेवाडी येथे ४० वर्षीय व्यक्ती घरात मृतावस्थेत आढळून आल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. दत्ताराम महादेव गुरव (वय ४०, रा. अंजनवेल सडेवाडी, ता. गुहागर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम गुरव हे राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी ही घटना घडल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ४७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.


