(राजापूर / तुषार पाचलकर)
हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेना पाचल विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला शिवसेना विभागप्रमुख विलास नारकर, ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ, विभाग संघटक अनंत कोलते, दिवाळवाडी शाखाप्रमुख राजेश (पप्पा) सुतार, पाचल रिक्षा संघटनेचे अध्यक्ष जयंत धावडे, उपविभागप्रमुख नितेश सावंत, राजापूर उपतालुका अधिकारी ओंकार नारकर, पाचल रिक्षा संघटनेचे सचिव विलास जाधव, पाचल युवासेना उपविभाग अधिकारी मनोज श्रीकृष्ण सार्दळ, कट्टर शिवसैनिक प्रवीण नारकर आणि पप्पू सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. शिवसेना पाचल विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिवसैनिक आणि युवासैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.


