(गुहागर / वार्ताहर)
लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत लोकशाही मूल्यांचे जतन आणि देशाच्या लोकशाही परंपरेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून गुहागर येथील भाजपा कार्यालयात उत्तर रत्नागिरी जिल्हास्तरीय ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाजपा प्रदेश सचिव तथा उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या संवाद कार्यक्रमात लोकशाहीची मूलभूत तत्त्वे, देशासमोरील विविध आव्हाने, लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण आणि राष्ट्रहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन करण्यात आले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी बजावायची भूमिका, जनतेमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आणि संघटनात्मक स्तरावर अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, भाजपा महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, जलगाव पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अँड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, खेड नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू रेडीज, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा सोशल मीडिया उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक वैभव नारकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर उपस्थित होते.
तसेच भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा चिपळूण तालुका सरचिटणीस गणेश हळदे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले आणि प्रदीप भोसले यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानाच्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचे रक्षण, राष्ट्रहिताविषयी जागरूकता आणि संघटनात्मक एकजूट अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. गुहागर येथे झालेल्या या ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रमातून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात अभियान अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.


