(जाकादेवी / संतोष पवार)
भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य या विषयावर त्रिरत्न बौद्ध महासंघ, रत्नागिरी यांच्या वतीने ८ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चार दिवसीय धम्मक्रांती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये हे निवासी शिबिर होणार आहे.
या शिबिराचे नेतृत्व पुणे येथील धम्मचारी यशोरत्न करणार आहेत. त्यांच्यासह सत्यरत्न, चंद्रनाथ, सत्यसागर, सुनंदक, प्रज्ञावज्र, शीलनंदक आदी धम्मचारी सहभागी होणार असून, ते प्रवचनांच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचा धम्म आणि त्यासंबंधित विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
या निवासी शिबिरात सहभागी होण्यासाठी १४ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेश घेता येणार आहे. शिबिरासाठी दानमूल्य २५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन त्रिरत्न बौद्ध महासंघ, रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र संतोष गमरे, रविकांत पवार, आनंदा कांबळे, भीमदास जाधव, भगवान जाधव, संदीप कांबळे, अनामिका जाधव, चंद्रलेखा पवार, स्मृती मोहिते, उमा गमरे, रुचिता शिंदे, सुप्रिया सावंत आदी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.


