(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उलट्या होऊन चक्कर येऊ लागल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नाणीज येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रघुनाथ वासुदेव रेवाळे (वय ६५, रा. घर क्रमांक २४०, रेवाळेवाडी, नाणीज, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ रेवाळे यांना अचानक उलट्या होऊन चक्कर येऊ लागली. प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ९३/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटल, रत्नागिरी येथे घडल्याची नोंद असून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.


