( रत्नागिरी )
हातखंबा येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्रीकांत उर्फ भाई शेठ मापुसकर ज्युनिअर कॉलेज, हातखंबा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
योग दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी प्रा. दत्तात्रय काळोखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष योगासने सादर केली. विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रशुद्ध महत्त्व आणि जीवनातील उपयोग समजावून सांगताना त्यांनी नियमित योगाभ्यासाचा आग्रह धरला.
कार्यक्रमाला प्रा. सुभाष रानमाळे, अन्य शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. योग दिनाच्या निमित्ताने शाळेत सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्यविषयक जागरुकता निर्माण झाली, अशी भावना सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.