(खेड / वार्ताहर)
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची नवीन घोषणा नुकतीच करण्यात आली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला या कार्यकारिणीत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. खेडचे सुपुत्र ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रभारी सुनिल राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या मान्यतेने नवीन प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली. ॲड. मिलिंद नांदगांवकर यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.
या निवडीची माहिती समोर आल्यानंतर खेड तालुक्यातील भाजपा युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ॲड. नांदगांवकर यांच्या निवडीबद्दल खेड तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा प्रेरित रिक्षा सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बांगी, भाजपा प्रेरित रिक्षा सेल खेड तालुकाध्यक्ष राजन खेडेकर, भाजपा रिक्षा युनिट उपतालुकाध्यक्ष संदीप शेंडगे, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, रविंद्र उर्फ बाबुशेठ नांदगांवकर, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, भाजपा खेड शहराचे विजय गुप्ता, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, भाजपा खेड शहर चिटणीस अनिकेत पवार, भाजपा युवा मोर्चा खेड शहर सरचिटणीस अभिलाष डंबे, भाजपा युवा मोर्चा खेड शहर कार्यकारिणी सदस्य रत्नदीप जाडकर, अहमद हमदुले, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी पार पाडताना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी ॲड. मिलिंद नांदगांवकर प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


