(गणपतीपुळे / वैभव पवार)
रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. मृगजा हळदणकर हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. अस्मी हळदणकर हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. श्रवण केदारी याने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
या कामगिरीच्या आधारे कु. मृगजा हळदणकर आणि कु. श्रवण केदारी या दोन खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिया सेठी यांनी विशेष अभिनंदन केले.
या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. रणजित जाधव, सौ. मिथिला मोरे, श्री. आदित्य पवार व रोहित यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकवृंदानेही सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले.


