(रत्नागिरी / वार्ताहर)
स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या आरोग्य विमा कंपनीने महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५७० कोटी रुपयांपेक्षा अधिक दाव्यांची (क्लेम्स) परतफेड केली आहे. या माध्यमातून राज्यातील ४ लाखांहून अधिक नागरिकांना पाठबळ मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
राज्यातील कुटुंबांना बदलत्या आरोग्यविषयक गरजा हाताळण्यास मदत करण्यामध्ये आरोग्य विम्याची भूमिका या आकडेवारीतून अधोरेखित झाली आहे. या तिमाहीत मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये आरोग्यसेवा वापराचे प्रमुख पॅटर्न दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख नागरी तसेच नव्याने विकसित होणाऱ्या बाजारपेठांमधील उपचारांच्या गरजांची माहिती मिळते. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत स्टार हेल्थने मुंबईत २८० कोटी रुपये मूल्याचे ४१,३०० हून अधिक दावे निकाली काढले. पुण्यात ११५ कोटी रुपये मूल्याचे २०,५०० हून अधिक दावे निकाली काढण्यात आले.
राज्यभरात कंपनीने एकूण ९३,००० पेक्षा जास्त दावे निकाली काढल्याचे सांगण्यात आले आहे. अस्थिरोग व ट्रॉमा, नेत्ररोग, मूत्ररोग आणि कार्सिनोमा यांसारख्या आजारांवरील उपचारांसाठी हे दावे करण्यात आले होते. महाराष्ट्रातील एकूण दाव्यांपैकी ४०.४ टक्के दावे ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांकडून आले आहेत. यावरून ज्येष्ठ वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा सातत्याने असल्याचे दिसून येते.
स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे सीएमओ हिमांशू वालिया म्हणाले, “अस्थिरोग व ट्रॉमा, नेत्ररोग, मूत्ररोग, कार्सिनोमा आणि हृदयरोग यांसारख्या आजारांचे वाढते प्रमाण दर्शवते की, आरोग्य विम्याकडे आर्थिक नियोजनाचा एक आवश्यक भाग म्हणून का पाहिले पाहिजे आणि आरोग्य विमा लवकर का घेतला पाहिजे. आमचे आरोग्यसेवा जाळे, तंत्रज्ञान आणि सेवा क्षमतेचा मेळ घालून आरोग्य संरक्षण अधिक सुलभ व विश्वासार्ह बनवणे आणि ग्राहकांचा प्रवास सोपा करणे यावर आमचे लक्ष आहे.”


