( रत्नागिरी / वार्ताहर )
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शाळांतर्गत अभंग, भक्तीगीत व बालगीत गायन स्पर्धा जी. जी. पी. एस. प्रशालेत नुकत्याच उत्साहात पार पडल्या. संस्थेअंतर्गत असलेल्या आठ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या पहिल्या गटात श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेच्या आर्वी सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवला. कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरच्या खुशी मडके हिने द्वितीय, तर अन्वी कुर्टे हिने तृतीय क्रमांक मिळवला. कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरच्या भावांश मेस्त्रीला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
इयत्ता तिसरी व चौथीच्या दुसऱ्या गटात कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरच्या अनुश्री जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेच्या कौशिकी नवाथे हिने द्वितीय, तर कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरच्या स्वरा चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला. या गटात इशिका पुसाळकर (कै. मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिर) आणि सारा कांबळे (श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळा) यांना विभागून उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या तिसऱ्या गटात श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेच्या रुही गोवळकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. रा. भा. शिर्के प्रशालेच्या इरा बोरवणकर हिने द्वितीय, तर कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या प्रथमी पित्रे हिने तृतीय क्रमांक मिळवला. ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलच्या अर्णव कदमला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
इयत्ता आठवी ते दहावीच्या चौथ्या गटात श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेच्या ऋग्वेद तेरेदेसाई याने प्रथम क्रमांक मिळवला. रा. भा. शिर्के प्रशालेच्या दिया परब हिने द्वितीय, तर श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यम शाळेच्या शौर्य सावंत याने तृतीय क्रमांक पटकावला. या गटात प्रसाद माचिवले (सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय), विभूती उभप (कै. शां. य. गोडबोले विद्यामंदिर, केळ्ये) आणि आदित्य धाक्रस (ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल) यांना विभागून उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला जी. जी. पी. एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मूरकर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख सौ. शुभदा पटवर्धन तसेच गुरुकुल प्रकल्पप्रमुख वासुदेव परांजपे उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. प्राची रानडे आणि शंतनु सावंत यांनी काम पाहिले.
स्पर्धेदरम्यान जी. जी. पी. एस.चे संगीत शिक्षक विजय रानडे यांनी हार्मोनियमची साथ दिली, तर तबलासाथ अथर्व घाणेकर यांनी केली.


